इतिहास कालीन मुर्डेश्वर मंदिराची माहिती
****************************************
****************************************
श्रावण मासातील शिवभक्तांची तपोभुमीःकेळगाव मुर्डेश्वर
****************************************
मराठवाडा आणि खानदेश च्या सिमारेषेवर वसलेले मुर्डेश्वर संस्थान प्रभु रामचंद्र व सिता माता या ठिकाणी खानदेश कडुन आगमन करून आले असता सिता मातेस शिवपुजेची आठवण झाली त्यांनी शिवलिगं स्थापन करून मागे खानदेश कडे मुरडुन
पाहिले म्हणुन या क्षेत्रास मुर्डेश्वर हे नाव पडल्याचे संगितले जाते.
निसर्गाच्या सानिघ्यात तपोवन नाशिक व अंजिठा पर्वत रांगातील डोंगर दर्या झाडे वन्य प्राणी यांनी हा परिसर नटलेला आहे.या मंदिराच्या दक्षिणेस एक ते दिड किलोमीटर अंतरावर केळगाव हे गाव आहे.
श्रावण मासात या मंदिराचा परिसर दुमदुमलेला आसतो.प्रत्येक सोमवारी 70 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी येतात.इथे असे जाणवते की प्रभु रामचंद्राने सा-या विश्वाला असा संदेश दिलेला आहे की सार- संसार करून काही वेळ निर्सगाच्या सानिध्यात येउन या पवित्र शिवलिंगाचे दर्शन आध्यात्मिकांचा सहवास घ्यावा असे इथे वाटते.श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थान हे महाराष्टृामध्ये चांगले नावारूपास आलेले आहे.या ठिकाणी औरंगाबाद जिल्यातुन मोठमोठया शाळांच्या अथवा कंपनीच्या सहली श्रावण मासामध्ये येत असतात.येथे नवीन येणारे भक्त चकित झाल्याशिवाय राहत नाहीत.
मुर्डेश्वराचे मंदिर हे ऐन पहाडाच्या टोकावर उभारलेले असुन या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालता येत नाही.या पहाडाची खोली जवळपास हजार फुट असुन मंदिराच्या
चौथऱ्यापासुन खान्देशचा भाग विना दुर्बिण दिसतो.या पवित्र स्थळी प. पु.बालयोगी काशिगीर महाराजांनी दोन यज्ञ केले आहेत.या मंदिराच्या परिसरात बजंरग बली शनिदेव गणपती बबळेश्वर रोहिदास महाराज शिवराम महाराज सितामाई अशी अनेक मंदिरे आहेत.बबळेश्वराचे मंदिर हे बबळा नदीच्या उगमस्थानावर आहे.या परिसरात मोठमोठे जुनाट वटव्क्ष शेकडो वर्षाचे साक्षीदार आहेत.येथील पहाडावर रानकेळी वेळु जाई साग जांभुळ पळस व अनेक प्रकारच्या आर्युवेद जडीबुटीचा समावेश आहे.श्रावण महिन्यात भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.गुरूपौर्णिमेला सुध्दा अनेक भाविक दर्शनाचा लाभ घेतात मंदिराच्या बाजुला भव्य दिव्य कलापुर्ण असे शनिमंदिर सुध्दा आहे.मंदिरालगतच्या बाजुला आंनदगड म्हणुन डोंगर आहे. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे !या उक्तीप्रमाणे या नदीच्या परिसरात हिरवळ दाटलेली आहे.या मंदिरावर पंचका्रेशीतील तसेच केळगावमधील लोक स्ंवयसेवक म्हणुन काम करतात.या मंदिराला एकदातरी आवश्य भेट द्यावी असे हे रम्य स्थळ आहे.
अशी माहिती या परिसरातील पत्रकार बंधु शिक्षक मित्र यानी देवून या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा. अशी अपेक्षा व्यक्त केली
केंद्रप्रमुख व सर्व मुख्याध्यापक केंद्रआमठाणा ता. सिल्लोड