इंद्रगढी देवी घाटनांद्रा
सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वाथ साधिके I
शरण्ये त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते II
संताची पावन भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील
सिल्लोड ,मराठवाडा,
उत्तर महाराष्ट्र, खान्देश व विदर्भाच्या
सरहद्दीवरचा तालुका जग प्रसिद्ध अजिंठा लेणीला जातांना पूर्ण प्रवासातला निम्मा
वेळ याच तालुक्यातून जातो. मराठवाड्यातल्या एकुण तालुक्यात या तालुक्याचा
लौकिक निश्चित पणे सर्वपरिचित असाच आहे .प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्षाने ,
वास्तव्याने पावन झालेला हा परिसर श्री मुर्डेश्वराच्या क्षेत्री त्यांचे
पाय लागल्याचा उल्लेख काशिखंडात आढळतो.संतमहंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला हा
परिसर अजिंठाच्या
डोंगररांगा म्हणजे तालुक्याला मिळालेली नैसर्गिक देणगीच आहे. या डोंगरामध्ये अनेक
प्राचिन देवी देवतांची जागृत देवस्थान आहेत. अजिंठा व वेरूळ लेण्यांच्या मध्यावर
असेच एक पवित्र देवस्थान सिल्लोडपासून पश्चिमेला 30 किलोमिटार
अंतरावर घाटनांद्रा येथे आहे. सिल्लोड तालुक्याचा शेवट असणारे हे गांव कन्नड,
सोयगांव व पाचोरा या तालुक्यांचा सरहद्दीवर आहे. पंधरा हजार
लोकवस्थीच्या घाटनांद्रा निर्सगाने आपल्या देणग्यांनी समृद्ध केले आहे. निजाम राजवटीमधे तालुक्याचे
यांच्या सीमेवर असल्याने एक मोठी बाजार पेठ आहे. असा एक ऐतहासिक वारसा लाभलेल्या
घाटनांद्राच्या उत्तरेला पाच किलोमिटर अंतरावर या समृद्ध अजिंठच्या
डोंगररांगांमधिल एक डोगंर रेणुका मातेचे अधिष्ठाण आहे शक्तीदेवीच्या
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठांपैकी पूर्ण पीठ माहुरगडाचे हे उपपीठ आहे.या
ठिकाणाला "इेद्रगढी देवी म्हणून ओळखले जाते. देवी कडे जातोना
खुप दुरवरून या गडाचे दर्शन होते.घाटपायथ्या पासून निसर्गरम्य झाडी, वाहणारे खळखळ पाणी आपल्याला मोहित करते.पूर्वी अतिशय घनदाट असणारे हे जंगल
सध्या मात्र विरळ झाले आहे.
ऋषींचा खोरा
इंद्रगढी देवीच्या
गडाच्या डाव्या बाजूस खोल दरीत एक 10x12फुट आकाराची गुहा आहे. गुहा ही अत्यंत अवघड ठिकाणी असल्याने तेथे जाणे
आहे. ऋषीचा खोरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुहेमधे शंकराची पिंड आहे. या गुहे
मध्ये ऋषी तपश्चर्या करीत असे. या गुहेच्या उत्तरेला तुळजापुरच्या देवीचे ऊपपीठ
असणाऱ्या जोगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदीर आहे. देवीमातेचे कान येथे सुरू असलेल्या
ऋषीच्या स्तवनाकडे असावे अशा विशिष्ट ठिकाणी ही गुहा आहे. या परिसरात बिवट्या
वाघोबाचे दर्शन कित्येकांना झाले आहे.
या ऋषींच्या खोऱ्याच्या एका अरण्यायिकेनुसार या डोंगराच्या पायथ्यापाशी असणाऱ्या
धारला गावामधील एक गुराखी भवानी बाबा हा या डोंगरांमध्ये गुरे चारायचा त्यांच्या
गायींच्या कळपामध्ये दररोज एक अनोळखी गाय चरायला यायची व संध्याकाळी केव्हा
दिसेनासी व्हायची ते कळेना.ही अस बरेच दिवस चालले. गाय कुणाच्या मालकींची आहे
यांचा जिज्ञासेने एक
दिवस गुराख्याने त्या गाईचा पाठलोग केला.ती गाय या ऋषीच्या गुहेजवळ थांबली. ऋषींनी
गाईला प्रेमाने हात फिरवला व दुध काढले गुराख्याने ऋषींचे दर्शन घेतले व शेवटी म्हणाला
की गेल्या अनेक दिवसापासून ही गाय माझ्या कळपात चरायला येत असून तीची आपण देखभाल
केली आहे.त्याचा मोबदला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तेव्हा ऋषींनी
त्याला याचे मोठे आश्चर्य वाटले मात्र प्रतिप्रश्न न करता त्याने आपल्या घोंगच्या
सवयी नुसार पुन्हा घोंगडी झटकली तेव्हा एक छोटा सोन्याचा तुकडा घोंगडीला चिकटलेला
दिसला मात्र त्याला आपण कोळसे फेकुन दिल्याचा खुप पश्चताप झाला.दुसऱ्या दिवशी
सकळीच तो त्या गुहे जवळ गेला आता मात्र तेथे ऋषींनी कोळशाच्या स्वरूपात आपल्याला
सोनेच दिले पण आपण अविश्वासाने फेकुन दिल्याचा त्याला पश्चाताप झाला तो ऋषींही
नव्हते व ती गाय ही नव्हती.शेवटी तो त्या कोळसे फेकलेल्या ठिकाणी आला तेथेही काहीच
नव्हते.पश्चातापने दग्ध झालेल्या गुरख्याने देवी मातेची आजन्म ऊपासना केली . आज ही या
परिसरातील गायी दुध देत नसल्या तर त्यांना या भवानी बाबाच्या तपस्येच्या ठिकाणी
नेतात यामुळे त्या पुर्ववत दुध द्यायला लागतात असा भाविकांचा अुनभव व विश्वास आहे.
दुसऱ्या एका प्राचिन अरण्यायिके
नुसार पूर्वी या गुहेमध्ये एक ऋषी राहयचे .दरम्यान सततच्या
विजयामुळे झालेल्या देवराज इंद्र याला
आपल्या सामर्थ्याचा गर्व चढला. या ठिकाणावरून आपली पत्यनी सची समवेत मार्गक्रमण
करीत असतांना त्याची उन्मत्त नजर या गुहेतील ऋषी कन्येवर पडली.नेहमी अप्सरांच्या
सानिध्यात शोभणारा इंद्र या ऋषीकन्येजवळ आला व थत्याने तिच्या सौंदऱ्याची कुचेष्ठा
करून कुत्सित हास्य केले
.
अपमान सहन न
झाल्याने या ऋषी कन्येने शाप दिला की तुझा शक्तिक्षय होईल . असे शापवाणी उच्चारताच
इंद्राचे तेजावलय व शक्तिवलय यांचा क्षय सुरू झाला.यानंतर मात्र देवराज इंद्र
भानावर आला.त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला व त्याने ऋषीकन्येची माफी
मागितली. मात्र उ:शाप देण्याचे सामर्थ्य तिच्याजवळ नसल्याने इ्ंद्राला खुप दु:ख
झाले. व तो शवेटी विष्णुकडे गेला.भगवान विष्णुने इंद्राला शक्तीमाता रुणुकेची
आराधना करण्यास सांगितले.इंद्र व सचीने आराधना केली व शेवटी रेणुका माता प्रसन्न
झाली व पश्चाताप
दग्ध शची व इंद्राला शापमुक्त केले. हे ठिकाण म्हणजेच इंद्रगढी आपल्या वाईट कृत्याचा
पश्चाताप झालेल्या भक्तांना अभय देण्यासाठी या ठिकाणी मातेने अधिष्ठान करावे अशी
इंद्राने अभिलाषा व्यक्त केली.तेव्हापासून उन्मत्तांना धडा शिकविण्यासाठी व
भक्तांना अभय देण्यासाठी इंद्रगढी माता येथे विसावली. हि इंद्र वर दायीनी आहे.
इंद्राला वर
देणारी "इंद्रवरदायिनी" हे खरे नाव मात्र त्यानंतर नावाचा
अपभ्रंष होऊन इंद्रगढी झाले असावे. समुद्र सपाटीपासून मोठ्या उंचीवर असणारे हे
ठिकाण दुरवच्या भक्तांचे कुलदैवत आहे.
गेल्यावर्षी शासनाने
दुष्काळी कामाअंतर्गत इंद्रगढीच्या पायथ्यापर्यंतचा डांबरी रस्ता बनवुन दिला असला
तरीही पुढचा चढण्यासाठीचा घाटातील रस्ता विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी बनवला
आहे.इंच्छा शक्तिच्या जोरावर अहोरात्र श्रमदान करून
चटण्यायोग्य सुकर बनवला आहे.मात्र अजुनही या वळणरस्त्यांची कामे व तटबंदी व्हावयास
हवी.
इंद्रगढी मंदीर :- संपुर्ण डोंगर चढल्यानंतर समोर एक लांबच लांब पठार दिसते.उजव्या
बाजुला एका दक्षिणमुखी हनुमानाची स्थापना करण्यात आली आहे. पूर्वीच्या काळी येथे
एक हनुमान मंदीर असल्याचे भक्तगण सांगतात.महादेवाचे प्रसिद्ध देवस्थान वाकीच्या श्री
नारायणदेव बाबा यांना यासंदर्भात अनेकदा दृष्टांतही झाला होता. मंदीराच्या यमोरच्या
डाव्या बाजूला एक तळं आहे. त्याला मातृपिर्थ म्हणून ओळखले जाते.यातिल पाण्याचा रंग
चहाच्या रंगासारखा असून या पाण्यामुळे थ्वचारोग नाहीसे होतात असा भक्तांचा विश्वास
आहे.पवित्र तिर्थ म्हणून या पाण्याचा भक्तगण प्राषन करतात.घाटमाथ्यावरील शुद्ध
हवेने वायस्नान झाल्यावर समोरच इंद्रगढी देवी मातेच्या मंदीराच्या कळसाचे दर्शन
होते. जिर्णोद्धारा पूर्वी प्राचिन काळात या देवीचे सुदेर असे मंदीर असावे. कारण
जुन्या मंदीराचे अनेक नक्षिकामाने व कलाकसरीने समृद्ध असे दगडांचे अवशेष मिळाले.
मात्र मधल्या मोठ्या कालखंडात या ठिकाणी मंदीर नव्हते.1990 मधे विश्वस्त
मडळाच्या सदस्यांनी या डोंगराच्या अत्यंत अवघड वाटेने स्त:च्या मंदीराच्या बांधकाम
साहित्याची वाहतूक करून हे मंदीर साकारले. माहुरच्या रेणुकामातेचे उपपीठ असणाऱ्या
या देवीची मुर्ती ही भक्तांना मंत्रमुग्ध करते. भव्यदिव्य देवीचा तांदळा पाहतांना
क्षणभर माहुरच्या देवीचाच आभस होतो.
वरद इंद्रेश्चर महादेव :- गेल्या
वर्षी या गढावर इंद्रेश्वर महादेवाची स्थापना करण्यात आली .निर्सगरम्य व एकांत
ठिकाणी शिव आणि शक्ति या दोघांची उपासना करतांना याधकाला एक वेगळाच आनंद व शांती प्राप्त
होते. या मंदीराच्या
उभारणीसाठी श्री
क्षेत्र मुर्डेश्वरचं पीठाधीपदी बालयोगी श्री काशीगिरी महाराज यांचे मालाचे
मार्गदर्शन लाभले.देवीच्या डाव्या बाजुला खान्देशाच्या परिसराचं विहंगम दृश्य न्याहाळतांना
विशेषत: पावसाळयातील धुके असतांना एक स्वर्ग सुखाचीच अनुभूती होते. खान्देशच्या
बाजूने डोंगराची उंची अधिक असल्याने त्या बाजूने डोंगरावर चढणे शक्य नाही.
जबल पुरकर महाराज:- गेल्या 20
वर्षापासून इंद्रगढी देवी येथे श्री जबलपुरकर महाराज यांचे वास्तव्य
लाभले आहे. महाराजांच्या प्रेरणेने सेथे वर्षभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात येते. आश्विनी नवरात्र व कार्तिकी उत्सव यादरम्यान येथे नऊ दिवस
अन्नछत्रही चालवले जाते. या सर्व कार्यक्रमांसाठी महाराजांचे विशेष मार्गदर्शन
असते.घाटनांद्रा येथील स्व.डॉ. सोनाप्पा गुळवे यांनी इंद्रगढी मातेचा फोटो
महाराजांना दाखवताच अत्यंत प्रभावित झालेले जबलपूरकर महाराज या ठिकाणी रममाण
झाले.केवळ फलाहार व दुध सेवन करणाऱ्या महाराजांचा संस्कृत व अध्यात्माचा व्यासंग
दांडगा.
कार्तिकी पौर्णिमाची यात्रा
:- दरवर्षी कार्तिक महिनयाच्या त्रिपुरारी पौर्णिोला इंद्रगढी गडावर
मोठी यात्रा भरते. यावेळी येथे अनेक नवसांची पुर्तता तसेच नविन नवसांची कबुली केली
जाते. दिवाळी साठी परिसरात आलेल्या माहेरवासी लेकी ही यात्रा झाल्याशिवाय सासरी जात
नाही. एक दिवसीय यात्रेसाठी प्रवासाचे मुख्य साधन असते ते म्हणजे बैलगाडी.यात्रेसाठी
काही भक्तगण लोटांगण घालीत येतात. संबळ व डफ या पारंपारिक वाद्यांच्या गजरात लहान
मुलांना निंब नेसवतात.येथे पूर्ण अजाबळी मोठ्या प्रमाणात दिले असत. परंतू विश्वस्त
मंडळाने ही प्रथा बंद केली. या दिवशी पूर्ण गाव हे डोंगरावर विसावते व दुपारी
रोडगे (पानगे) तयार करून देवीस नैवेद्य दाखवतात. आपल्या कुटुंबियांसमवेत
एक दिवस वनभोजनाचा आनंद घेतांना अनोखे आत्मिक समाधान भक्तांना
लाभते.
************** धन्यवाद !***************
मार्गदर्शन व विषेश सहकार्य
श्री कुंभारे सर (केंद्राप्रमुख आमठाणा)
9423981431
माहिती संकलन कर्ता
श्री जोशी सर